कुठे गेले ते दिवस....

 कुठे गेले ते दिवस...

 हसण्याचे हसत-हसत जगण्याचे..

तू सोबत असताना नाही वाटली..

कधी आईची कमतरता..

ना कधी बहिणीचा जिव्हाळा,

कुठे गेले ते दिवस.....

मराठी कविता


रोज रोज सोबत असण्याचे..

 कुठेही सोबत जाण्याचे..

 एक दुसऱ्याला समजण्याचे..

 एक दुसर्‍यांच्या चुका काढण्याचे..

 कुठे गेले ते दिवस...


चुकलं असेल कधी माझंही.. कधी तुझेही.. नाही बोलत असली तरी,

आठवण फक्त तुझीच येते...

 तू फक्त माझीच आहेस ,

माझे मन मात्र हेच सांगत असते...

बोलायचं तर खूप असतं तुझ्याशी... 

पण वेळच कधी मिळत नाही...

आणि मिळाला ही तरी बोलणं.. 

कधी होत नाही...


कुठे गेले ते दिवस... 

फक्त आपल्या दोघींचेच..

आपल्याच अधिकाराचे..

तुझ्यासोबत हसायला मला खूप आवडतं.

 तुझ्या बोलण्यापेक्षा तुझ हसणं च मला खूप भाळत..


अशी का ग करते तू बोलत जा ना माझ्याशी...

 नाही बोलली तरी हसत जा माझ्याशी ....

2 टिप्पणियाँ